रत्नागिरी:- काळाबादेवी समुद्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराचा तोल जाऊन पाण्यात पडून मृत्यु झाल्याची घटना मंगळवारी घडली.
शंकर गंगाराम कांबळे (59, रा. काळाबादेवी, टेमरेवाडी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा उद्देश शंकर कांबळे (24, रा, काळाबादेवी, टेमरेवाडी) याने ग्रामीण पोलीस स्थानकात खबर दिली. शंकर हे मंगळवारी सकाळी काळाबादेवी समुद्रात मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र भरतीच्या वेळी त्यांचा तोल जाऊन पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.









