रत्नागिरी:- वाढता उष्मा, त्यामुळे होणारे बाष्पीभवन यामुळे शहराला पाणी पुरवठा करणार्या शिळ धराणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे.पावसाळा सुरु होईपर्यंत शहरवासियांना पाणी मिळावे यासाठी शनिवार दि.२१ मे पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी शहराला नियमितपणे शिळ धरण , पानवल धरण व एमआयडीसी या तीन मुख्य उद्भवावरुन पाणीपुरवठा केला जातो . पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारी मध्ये पूर्णपणे संपुष्टात आला असुन पानवल धरणावरुन योजनेतील नविन जलशुद्धीकरण केंद्राच्या कामामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा सप्टेंबर पासून बंद आहे.तसेच , नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्याने एमआयडीसी वरुन होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद केलेला असुन केवळ १० टक्के इतकाच अंशत पाणीपुरवठा सुरु आहे. सद्यस्थितीत संपूर्ण शहरात केवळ शिळ धरणावरून अखंडीतपणे पाणीपुरवठा सुरु आहे. प्रतिदिन २० एमएलटी पाणी शिळ धराणातून उचलले जाते. लांबलेले पर्जन्यमान व उष्ण तापमानामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे शहराचा मुख्य जलस्त्रोत असणार्या शिU धरणातील देखिल पाणीपुरवठा वेगाने कमी होत आहे. सद्यस्थितीत धरणात केवळ ०.५८९ द.ल.घ.मि. इतकाच जिवंत पाणीसाठा व ०.५६२ द.ल.घ.मि. इतका पाणीसाठा शिल्लक आहे . उपलब्ध पाणीसाठा केवळ दि. ५ जुन पर्यंतच पूरु शकेल. मान्सुनचे आगमन लांबल्यास शहरात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने संभाव्य पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करणेसाठी व पावसाळा हंगाम सुरु होईपर्यंत शहरातील नागरीकांस पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी शनिवार दि . २१ मे पासुन मान्सुनच्या आगमनापर्यंत संपुर्ण शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दि.२१ मेपासून नव्या वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होणार आहे. खालील भागात शुक्रवार, शनिवार पर्यंत नियमित व त्यानंतर (पहिला दिवस) सन्मित्रनगर, गवळीवाडा , आंबेशेत , लांबेचाळ , माळनाका , मारुती मंदिर , एस.व्ही.रोड , हिंदू कॉलनी , थिबापॅलेस परीसर , आनंदनगर , विश्वनगर , नूतननगर , अभ्युदयनगर , उदयमनगर , नरहरवसाहत , शिवाजीनगर , साळवी स्टॉप , रमेशनगर , छत्रपतीनगर , सहकारनगर , विष्णूनगर , नवलाईनगर , चाररस्ता मजगाव रोड , स्टेट बँक कॉलनी , म्युनिसिपल कॉलनी , एकता मार्ग , राजापूरकर कॉलनी , कोकणनगर जुने , किर्तीनगर , कोकणनगर या भागाला पाणी पुरवठा होईल. खालील भागात शुक्रवारपर्यंत नियमित त्यानंतर (दुसरा दिवस) राजिवडा , निवखोल , शिवखोल , गवळीवाडा , बेलबाग , चवंडेवठार , घुडेवठार , खडपेवठार , मांडवी , राम आळी , मारुती आळी , गोखले नाका , राधाकृष्ण नाका , झारणी रोड , जेल रोड परिसर , धनजी नाका , आठवडा बाजार , झाडगाव , टिUक आळी , शेरेनाका , तेलीआळी , जोशी पालंद , वरची आळी , खालची आळी , लघुउद्योग , मुरुगवाडा , मिरकरवाडा , राजवाडी , ८० फुटी हायवे परिसर , पेठ किल्ला , मांडवी , वरचा फगरवठार , पोलीस लाईन , तांबट आळी , भुवड आळी , आंबेडकरवाडी , राहूल कॉलनी , फातीमा नगर , आझाद नगर , कुंभारवाडा या भागात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.मान्सुनच्या अनिश्चिततेचे प्रमाण वाढल्यास धरणातील पाणीसाठा देखिल उपसा करून जलशुद्धीकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्याची नगरपरिषदेने पूर्व तयारी केली आहे . तरी , सर्व नागरीकांनी पाण्याचा पूरेसा साठा करुन त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले आहे.