रत्नागिरी:-सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०७ नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदांचा समावेश असून रनप निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि राजापूर या चार नगर परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी १० मे पासून असून १४ मे पर्यंत असणार आहे. २३ मे (सोमवार) पर्यंत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार आहे.
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त विभागाकडे 30 मे पर्यंत अहवाल पाठवणे आवश्यक असून 6 जूनला अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणेत येणार आहे.