लोटे वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या नवीन प्लांटची सल्फ्युरिक ऍसिडची पाईप फुटली; ग्रामस्थांना त्रास

खेड:-लोटे औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या नवीन प्लांट मध्ये मंगळवारी ( दि. ३) सायंकाळी सल्फ्युरिक ऍसिडची पाईप फुटल्याने हवेच्या संपर्कात रसायन आले. दरम्‍यान रसायन हवेत पसरलेल्या धुराने नजीकच्या लोटे तलारीवाडीतील काही ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला.

लोटे परिसरातील नागरिक या घटनेमुळे धास्तावले. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे लोटे व पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले असून पुष्कर कंपनीच्या या नवीन प्लांटमध्ये घडलेल्या या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.