रत्नागिरी:-राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील हल्ल्या प्रकरणात सहभागी सर्व एसटी कर्मचाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ४ एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यांनी जरी हजर होण्यासाठी अपील केले तरी त्यासाठी महामंडळ वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी एसटी विभागाने दिली.
मुंबई आझाद मैदानावर राज्यभरातील एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते, याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर सर्व कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता या चारही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना जामीन मिळाला आहे, मात्र अद्यापही ते हजर व्हायला आले नाही मात्र आल्यास त्यांचे अर्ज महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहे महामंडळाच्या निर्णयानंतरच त्यांना हजर करायचे की नाही ते ठरेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.