कोळकेवाडी धरणात चारजण बुडाले; दोघांना वाचवण्यात यश, दोघे बेपत्ता

चिपळूण:-चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील चार युवक कोलकेवाडी येथे पोहण्यासाठी गेले असता कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चोघेजण बुडाले. बुडणाऱ्या चौघांपैकी दोघाना वाचवले तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये अलोरे सोमेश्वर मंदिर नजीक राहणारा सुजय संजय गावठे व त्याची मैत्रीण ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर यांचा समावेश आहे.

बुधवारी सायंकाळी बेपत्ता सुजय गावठे ,ऐश्वर्या श्रीकांत खांडेकर सोबत शाहीन कुट्टीनो ,रुद्र जंगम कोळकेवाडी टप्पा चार नजीक कालव्यात पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेल्यावर ही दुर्घटना घडली. पाण्यात बुडू लागल्याने त्यांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून लगत काम करणाऱ्या कामगारांनी धाव घेतली. रुद्र आणि शाहीन याना बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सुजय बाहेर येत होता मात्र ऐशवर्या बुडत असल्याचे बघून पाण्यात परत गेला मात्र दोघेही बेपत्ता झाले. 

दुर्घटनेची माहिती मिळताच अलोरे पंचक्रोशीतील जि प सदस्य विनोद झगडे, तुषार चव्हाण, प्रमोद महाजन, घनश्याम पालांडे, प्रकाश आंब्रे आणि अनेक युवा कार्यकर्त्यांनी कोळकेवाडी  धरण परिसराकडे धाव घेतली .त्यानंतर बचाव कार्य सुरुवात झाली. आलोरे शिरगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता दोघांचा शोध घेण्यात येत होता मात्र उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.