रत्नागिरी:- धोपेश्वरमधील रिफायनरीसाठी बुधवारी धोपेश्वरमध्ये ग्रामसभेच आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेत रिफायनरी न होण्याबाबतचा विशेष ग्रामसभेत ठराव करण्यात आला. त्यामुळे आता या रिफायनरीला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याचं समोर आले. दरम्यान या ग्रामसभेत रिफायनरीला विरोध करणाऱ्यांची मतं – 466 तर समर्थकांची मते – 144 असून उरलेले तटस्थ – 23 मते पडली आहेत.
कोकणातील रिफायनरी बारसू गावात होणार असल्याचे चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात बारसू गावचा उल्लेख केला आहे. तर, धोपेश्वर ग्रीन रिफायनरी असं या रिफायनरीचं नाव ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, याच गावची ग्रामसभाआज 6 एप्रिल रोजी आयोजित केली होती आणि आता या सभेमध्ये रिफानरीबाबत ठराव करण्यात आळा आहे तो या रिफायनरीच्या विरोधातच असल्याने धोपेश्वर मध्ये रिफायनरी होण्याची आशा मावळली आहे.