दापोलीत विवाहितेच्या खून तर खूनानंतर सासऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

दापोली:-दापोली तालुक्यातील टाळसूरे या गावातील आरती अभिषेक सणस (वय 32) या विवाहितेचा खून करण्यात आला असून विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या सासऱ्यानी देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दि.२९ मार्च रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आरती सणस या आशा सेविकेचा घरातीलच कोणीतरी खून केल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. या विवाहितेचा खून झाल्यावर तिचे सासरे मधुकर धोंडू सणस यानी स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याना जखमी अवस्थेत डेरवण येथे हलविण्यात आले आहे. सदर मयत विवाहितेचा विवाह आठ ते नऊ वर्षापूर्वी झाला असून तिला सहा वर्षाचा मुलगा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्राथमिक अंदाजावरून या महिलेचा खून हा जवळच्या व्यक्तीकडून झाला असल्याचा दाट संशय असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी काशिद ,दापोली पोलीस निरीक्षक आहिरे पोलीस पथकासहीत दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. पुन्हा एकदा महिलेच्याच खूनाची घटना दापोली तालुक्यात घडली असल्याने  सुसंस्कृत तालुका पुन्हा हादरला आहे.