कशेडी घाटात मालवाहू ट्रक उलटून एक जण ठार

खेड:- मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कडाप्पा व लादी वाहतूक करणारा मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला हा अपघात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

शोएब आतुर खान (वय ३२ रा. राजस्थान) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर बद्रुद्दीन फारूख (वय ३२) हा अन्य चालक गंभीररित्या जखमी झाला आहे.

ट्रक चालक शोएब खान हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र आरजे १४जीएच ९५१४) यावर बद्रुद्दीन शेख या अन्य चालकाला घेऊन राजस्थान येथून कडाप्प लादी घेऊन गोव्याच्या दिशेने येत होता तो कशेडी घाट उतरत असताना तीव्र उतारात त्याचा ट्रक वरील अचानक ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दरडीवर जावून ट्रक आदळला. यात शोएब हा चालक जागीच ठार झाला तर बद्रुद्दीन शेख हा चालक चालक केबिनमध्ये अडकून पडत गंभीर जखमी झाला.