जिल्ह्यात 119 नवे कोरोनाबाधित

रत्नागिरी:- 24 तासात 1 हजार 577 अहवालांमध्ये तब्बल 119 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताच्या मृत्युची नोंद झालेली नसून 111 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 111 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 79 हजार 955 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.61 टक्के आहे. नव्याने 119 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 622 इतकी झाली आहे. 

 नव्याने एकाही मृत्यूची नोंद झाली नसून  आतापर्यंत 2 हजार 511 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.0 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 758 तर संस्थात्मक विलगीकरणात 342 रुग्ण उपचार घेत आहेत.