जिल्ह्यात नव्याने 228 तर आतापर्यंत 82 हजार कोरोनाबाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात 24 तासात 1807 अहवालांमध्ये तब्बल 228 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून जिल्ह्यात सद्यस्थितीत 1 हजार 275 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 78 हजार 385 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  95.41 टक्के आहे. नव्याने 228 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 82 हजार 155 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नसून आतापर्यंत 2 हजार 495 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.05 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 1005 तर संस्थात्मक विलगीकरणात 270 रुग्ण उपचार घेत आहेत.