रत्नागिरी:- अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा त्यांना स्वतला कुटुंबाला पाळीव जनावरांना त्रास सोसावा लागतो. प्रसंगी प्राण सुद्धा गमवावे लागतात. तसेच पिके, फळझाडांचे सुद्धा मोठया प्रमाणात नुकसान होते. जिल्ह्यात (चिपळूण) वनविभागांतर्गंत मागील 3 वर्षात मनुष्यहानी, पशुधनहानी व शेतपिकहानी पोटी 2 हजार 162 लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे 1 कोटी 95 लाख 1616 रु. नुकसानभरपाई वितरीत करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गसंपन्नतेचे वरदान लाभले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या 820800 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी वनविभागाचे 9602.8979 हेक्टर क्षेत्र आहे. उर्वरित क्षेत्रावर उत्तम प्रकारचे झाडोरा आहे. वनांना व वन्यजीवांना संरक्षण व उपयुक्त निवासाची सोय उपलब्ध झाल्याने वन्यप्राण्यांची संख्या वेगाने वाढली. परंतु जंगलात पर्याप्त खाद्य उपलब्ध होत नसल्याने पहाटे व सायंकाळच्या सुमारास जंगल परिसरातील शेतशिवारात वन्यप्राण्यांचा संचार वाढीस लागला आहे. परिणामी अलीकडील काळात वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढू लागला आहे.
राज्यातील रानडुक्कर, हरिण ( सारंग व कुरंग ), रानगवा, निलगाय, माकड, वानर तसेच वन्यहत्ती, बिबटे अशा वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली. शेतकऱ्यांना शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मिळवण्यासाठी वेळेत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. मागील 3 वर्षात जिल्ह्यात वन्यपाण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानीची 29 प्रकरणे घडली. त्या प्रकरणातील लाभार्थींना नुकसानभरपाई योजनेतून 17 लाख 55 हजार 163 रु. नुकसानभरपाई देण्यात आली.
2018-19 मध्ये 1 लाभार्थ्यांला 1,45,000, सन 2019-20 मध्ये 18 लाभार्थ्यांना 7,95,000, सन 2020-21 मदये 10 लाभार्थ्यांना 5,90,163 दिले. तर 2021 ते 11 जानेवारी 2022 अखेर एका लाभार्थ्यांला 1,25,000 (देणे बाकी आहे). पशुहानीची 1375 पकरणे घडली. त्या लाभार्थी शेतकऱयांना 1 कोटी 25 लाख 92 हजार 177 रु. नुकसानभरपाई देण्यात आली. त्यामध्ये सन 2018-19 मध्ये 311 लाभार्थ्यांना 27,6,775, सन 2019-20 मध्ये 411 लाभार्थ्यांना 38,41,052, सन 2020-21 मध्ये 350 लाभार्थ्याना 33,57,000 तर 2021 ते 11 जानेवारी 2022 अखेर 303 लाभार्थ्याना 26,87,350 देण्यात आले.
शेत पिकाचीही वन्यप्राण्यांकडून मोठी नुकसानीची प्रकरणे वनविभागाकडे सादर करण्यात आली. त्या 758 लाभार्थ्यांना एकूण 51 लाख 54 हजार 276 रु.ची नुकसान भरपाई मंजूर होउन ती वितरीत करण्यात आल्याचे वनविभाग चिपळूण यांच्यावतीने सांगण्यात आले. सन 2018-19 मध्ये 103 लाभार्थ्याना 7,12,410, सन 2019-20 मध्ये 190 लाभार्थ्याना 11,27,218 रु., सन 2020-21 मध्ये 252 लाभार्थ्याना 17,38,954 रु, सन 2021 ते 11 जानेवारी 2022 अखेर 213 लाभार्थ्याना 15,75,694 वितरीत करण्यात आले.









