रत्नागिरी:- जल्लोष ग्रुप, कर्ला, रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत छोट्या गटात सार्थक, स्वरांजली आणि सायली कार्लेकर या भावंडानी प्रथम क्रमांक पटकावला. तर मोठ्या गटात चिपळूणच्या स्पर्धकांनी वर्चस्व राखले.
रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशनच्या मान्यतेने १ जानेवारी रोजी कर्ला येथे १२, १४, १७ आणि पुरुष व महिला गटाची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभरातून ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
जल्लोष ग्रुप कर्ला चे आयोजक अनुराग झापडेकर, मिलिंद हातफले, अमित चव्हाण,अॅड. सुजित कीर तसेच स्वराज्यवाडी, लिमयेवाडी ,भंडारवाडी ,नाईट कट्टा ,सर्व बचत गट,आशा सेविका तसेच कर्ला जूवे च्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली.
प्रथमच स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या जल्लोष ग्रुपने अतिशय नेटके असे स्पर्धेचे आयोजन केले. सर्व सहभागी स्पर्धकांनी उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले. प्रत्येक गटातील प्रथम चार क्रमांकांच्या विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, मेडल, प्राविण्य प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. सर्व सहभागी खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र अल्पोपहार देण्यात आला.
स्पर्धेचा निकाल- १२ वर्षाखालील मुले २ किमी – १) सार्थक कर्लेकर, रत्ना. २) सर्वेश ठीक, रत्ना. ३) प्रसाद बळकटे, रत्ना. ४) युवराज कोळेकर, रत्ना. १२ वर्षाखालील मुली २ किमी – १) स्वरांजली कार्लेकर, रत्ना. २) सिद्धी चव्हाण, रत्ना. ३) श्रावणी सनगरे, रत्ना. ४) शर्वरी शिंदे, रत्ना.
१४ वर्षाखालील मुले ३ किमी. – १) श्रेयश ओकटे, चिप. २) तन्मय कुळ्ये, रत्ना. ३) वेदांत चव्हाण, रत्ना. ४) सागर गडदे, रत्ना. १४ वर्षाखालील मुली ३ किमी. – १) सायली कार्लेकर, रत्ना. २) आर्य डोर्लेकर, रत्ना. ३) गायत्री भोसले, रत्ना. ४) मृण्मयी नागवेकर, रत्ना.
१७ वर्षाखालील मुले ४ किमी. – १) स्वराज जोशी, चिप. २) समर्थ सांडींम, रत्ना. ३) अमोल शिगवण, चिप. ४) अथर्व माने, रत्ना. १७ वर्षाखालील मुली ४ किमी. – १) ख़ुशी हसे, चिप. २) संजना हरावडे, चिप. ३) रिया गुजर, चिप. ४) सांची कांबळे, रत्ना.
पुरुष गट ६ किमी. – १) ओंकार बैकार, चिप. २) सिद्धेश बर्जे, चिप. ३) अविनाश पवार, चिप. ४) शुभम धाडवे, रत्ना. महिला गट ६ किमी. – १) साक्षी जाड्याळ, चिप. २) अमिषा मांजरेकर, रत्ना. ३) साक्षी पवार, चिप. ४) कांचन मोरे, रत्ना.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून कर्ला नाईक सी फुड्स चे व्यवस्थापक श्री शकुरभाई शेख, पंचायत समिती कर्ला चे सदस्य श्री दत्तात्रेय उर्फ बाबुशेठ मयेकर कर्ला सरपंच सौ जबिन शिरगावकर ,उपसरपंच श्री समीर भाटकर ,श्री निसार भाई बोरकर,ग्राम पंचायत सदस्य श्री अख्तर शिरगावकर ,शिवसेना विभागप्रमुख श्री गणेश भारती,श्री अभिकांत कीर,श्री संतोष चव्हाण,श्री मिलीऺद रमाकाऺत सुर्वै ,श्री सागर सुर्वे श्री विलास कुळ्ये ई उपस्थित होते
ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा ॲथलेटीक्स असोसिएशयनच्या परवानगीने घेण्यात आली होती त्याचे पदाधिकारी श्री संदीप तावडे सर, श्री विनोद मयेकर सर ,श्री राकेश मालप सर यांनी पंच म्हणून काम पाहिले व स्पर्धा यशस्वी केली









