पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग; दोघांपैकी एकास पोलीस कोठडी 

रत्नागिरी:- देवरुख येथील घरात शिरुन पाणी मागण्याच्या बहाण्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला न्यायालयाने शनिवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. 

धर्मराज बापू पवार असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. तर त्याचा साथीदार संतोष राघो पागळे हा फरार असून देवरुख पोलिस त्याचा शोध घेत आहेत. १३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. पीडिता घरी असताना संशयितांनी पिण्यासाठी पाणी मागितले असता हा प्रकार घडला. पोलिसांनी धर्मराज पवारला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.