मुंबई- गोवा चौपदरीकरणाचा शुभारंभ आणखी दोन वर्षे लांबणीवर

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा वेग थंडावल्याने आता या मार्गाचे काम पुर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षांचा कालावधि लागणार आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्याचे काम घेतलेल्या कंपनीने केवळ १५ टक्केच काम झाले आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईचा फटका सर्वसामान्यांना बसणार असून महामार्गाचे काम २०२१ मध्ये पुर्ण करण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न अधूरे राहणार आहे.   

मुंबई‚गोवा राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा ४५० किलोमीटरचा  मार्ग आहे. आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे इंदापूर ते झाराप असा ३६६ किलोमीटरचा महामार्ग आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला २०१३ ला प्रशासकीय मंजुरी मिळाली. सुरुवातीला ११,७४५ कोटी रुपयांची तरतूद या महामार्गासाठी करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्षात २०१४ ला भूसंपादन कामाला सुरुवात झाली. तीन वर्ष भूसंपादन काम सूर झाल्यानंतर ८० टक्के प्रकल्पग्रस्तांची जमीन ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला २०१७ ते २०१८ यावर्षी सुरुवात झाली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तीन जिह्यात दहा टप्प्यांमध्ये काम सुरू करण्यात आले.     

मात्र आज या कामाची गती पाहता मुंबई‚गोवा महामार्गाचे काम अद्यापही रखडलेल्या अवस्थेतच आहे.  इंदापूर ते झाराप असलेल्या ३६६ किलोमीटरचा मार्ग अद्यापही प्रवासासाठी सुखकर झालेला नाही. या महामार्गावर दहा टप्प्यात काम सुरू आहे. मात्र पत्यक्षात तीन टप्पेच जवळपास पूर्ण होत आले आहेत. उर्वरित सात टप्प्याचं काम अद्यापही कुर्मगतीने सुरू आहे. राजापूर ते झाराप  या मार्गातील तीन टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले. मात्र अन्य सात टप्प्याचं काम अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहे. तर संगमेश्वर ते लांजा या टप्प्यातील अवस्था अत्यंत कुर्मगतीने सुरू आहे. केवळ १२ टक्केच एक काम पूर्ण झालेला आहे. एमईपी  या कंत्राटदार कंपनीकडे हे काम देण्यात आलं होतं. त्यासाठी १३०० कोटी ची तरतूद देखील करण्यात आली. एमईपे केवळ १६ टक्के काम केले. त्या कंपनीला ५३ कोटी  रक्कम देण्यात आली. मात्र या कंपनीने कामात कोणतीच प्रगती केलेली नसल्याने अतिशय संथ गतीनं  या टप्प्यातील काम सुरु आहे. या महामार्गा कामासंदर्भात प्रशासनानं या कंपनीला नोटीस देखील बजावली आहे. कामाची खात्री न दिल्यास त्यांच्याकडील कंत्राट हे दुसर्या कंपनीला देण्यात येईल अशी सुचना देखील देण्यात आलेली आहे.