आजोबांच्या घरातच नातवाने घेतला गळफास; तालुक्यातील जांभारी येथील घटना

रत्नागिरी:- आजोबांच्या घरात जाऊन नातवाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील जांभारी विठ्ठलवाडी येथे शनिवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमाराला घडली. स्वरूप नंदकुमार कुर्टे (१९) असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत दशरथ भिवा मांडवकर (रा. जांभारी, विठ्ठलवाडी) यांनी जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली. स्वरूप हा जांभारी येथील विठ्ठलवाडी येथे राहताे. स्वरुपच्या घराशेजारीच सखाराम विठू पागडे या त्याच्या आजाेबांचे घर आहे. ताे शनिवारी आजाेबांच्या घरी गेला हाेता. घरातील माजघरात जाऊन त्याने छपराच्या लाकडी वाशाला कापडाच्या सहाय्याने गळफास घेतला. बराचवेळ ताे माजघरातून बाहेर न आल्याने ते आतमध्ये गेले. त्यावेळी स्वरूप गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. त्याला तत्काळ वाटद – खंडाळा येथील रुग्णालयात आणले. तेथे डाॅक्टरांनी त्याला तपासले असता त्याला मृत घाेषित केले. अधिक तपास पोलीस हवालदार किशोर धातकर करीत आहेत.