जिल्ह्यात 24 तासात 65 जण कोरोना पॉझिटिव्ह; 133 कोरोनामुक्त

रत्नागिरी:-गुरुवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 65 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 133 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 73 हजार 598 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.36 टक्के आहे. नव्याने 65 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 179 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 3 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात 24 तासातील 2 तर यापूर्वीच्या एक मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 379 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 459 तर संस्थात्मक विलीकरणात 417 रुग्ण उपचार घेत आहेत. 24 तासात 2 हजार 736 अहवाल निगेटिव्ह आले असून आता पर्यंत 7 लाख 15 हजार 709 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.