मुंबई:- तौत्के, निसर्गवादळ तसेच अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण तसेच पश्चिम माहाऱाष्ट्रात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचे प्राण गेले. ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने मोठा निर्ण घेतला आहे. राज्य सरकारने चक्रीवादळांचा बंदोबस्त तसेच कायमस्वरुपी उपायोजना करण्यासाठी 3 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.
या निधीच्या मदतीने पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीशी सामना करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. कोकणातील जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्तींशी सामना करता यावा तसेच आपत्तींचा कायमस्वरुपी बंदोबस्त व्हावा यामुळे राज्य सरकारने तीन हजार कोटी रुपयांचा निधी कोकोणाला दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये तीन हजार कोटी रुपायांतून वेगवेगळी कामे केली जातील. यामध्ये प्रामुख्याने धूप प्रतिबंधक बंधारा, शेलटर हाऊस, अंडर ग्राउंड केबलिंग ही कामे केली जातील.









