रत्नागिरी:- राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मोबाईल परत 30 ऑगस्टपर्यंत परत करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सौ. संज्योती शिंदे यांनी सांगितले.
पोषण आहार अभियानांतर्गंत राज्यातील 1 लाख 5,592 अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी मोबाईल वाटप करण्यात आले. त्यातील हजारों मोबाईल बिघडलेले आहेत तर 3 हजारांहून अधिक मोबाईल बंद पडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातही हीच अवस्था आहे. पोषण अभियान कार्यकमांतर्गंत सन 2019 मध्ये राज्यातील अंगणवाडी सेविकांना शासकीय कामासाठी वाटप केलेले मोबाईलची वॉरंटी दोन वर्षांची होती. तो कालावधी मे 2021 मध्ये संपला आहे. मोबाईल 2 जीबी रॅमचा आहे. मात्र मोबाईलमध्ये लाभार्थींची नावे, हजेरी, वजन, उंची, स्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इ. सविस्तर माहिती भरण्यात येते. मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे व त्यात भरावयाची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग होतात. लवकर गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठीण होते. तसेच सतत नादुरूस्त होतो, त्यामुळे दुरूस्तीसाठी 3 ते 8 हजाराचा खर्च होते. हा खर्च अंगणवाडी सेविकांकडून वसूल केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण आहार ट्रॅकर ॲप दिले आहे. पण हे ॲप मोबाईलची रॅम कमी असल्यामुळे डाउनलोड होत नाही. त्यामुळे सेविकांना आपल्या खासगी किंवा वैयक्तिक मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करावे लागते. ॲप इंग्रजी असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना त्रयस्थांच्या मदतीशिवाय माहिती भरणे शक्य होत नाही. हे काम दैनंदिन करावे लागत असल्याने अडचण उभी राहते. माहिती भरण्याची पध्दतही अतिशय किचकट असल्यामुळे, या त्रुटेंमुळे अंगणवाडी सेविका त्रस्थ झालेल्या आहेत.
सद्याचे मोबाईल निकृष्ट व सदोष असल्यामुळे अंगणवाडी सेविकांना चांगल्या पतीचे मोबाईल द्या, अंगणवाडी सेविकांना मराठी भाषेमध्ये निर्दोष पोषण ट्रॅकर ॲप द्या, या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी सर्व पकल्प अधिकाऱ्यांकडे या मागण्या लेखी सादर करण्यात येत आहे. परंतु शासनाकडून काहीही पतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाईल एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयात परत करणार असल्याचे राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सांगितले आहे. वॅढश हा चांगल्याप्रकारे चाललेला ॲप बंद करून पोषण ट्रॅकर हा सदोष ॲप शासनाने दिला. मात्र अनेक अडचणी कामकाजासाठी निर्माण होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडोपाडी नेटवर्पचा मोठा पश्न आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही पत्येक तालुका 30 ऑगस्ट 21 पर्यंत सर्व मोबाईल परत करणार आहेत. रत्नागिरी तालुका 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता रत्नागिरी पकल्प कार्यालयात मोबाईल परत करणार असल्याचे जिल्हाध्यक्षा सौ. संज्योती शिंदे यांनी सांगितले आहे.









