रत्नागिरी:- मागील 24 तासात 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
नव्याने 116 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 881 इतकी झाली आहे. 24 तासात 130 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 70 हजार 995 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 245 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.00 तर रिकव्हरी दर 94.82 टक्के आहे.









