रत्नागिरी:- जिह्यातील 465 माध्यमिक शाळांपैकी आतापर्यंत 15 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अभ्यासाचे काम सुरू झाले आहे. या शाळांमध्ये 1239 विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात दाखल होऊन मार्गदर्शन घेत आहेत.
येत्या 17 ऑगस्टपासून इ. 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू करण्याचे जरी निर्णय झालेला असला तरीही त्याबाबत जिल्हा माध्यमिक विभागाकडे कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी प्रस्ताव दिलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जुलैमध्ये महिनाभरात एकही कोरोना रुग्ण न आढळलेल्या गावात या शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्dयात 465 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये एकूण 1 लाख 925 इतकी विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यासाठी गावातील ग्रामपंचायतींचा ठराव घेण्याचे तसेच पालकांचे संमतीपत्र घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
गेल्या जुलैमध्ये जिल्ह्यातील केवळ 6 माध्यमिक शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या होत्या. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती कमी होताच ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील एकूण 15 शाळांमध्ये पत्यक्ष अध्यपनाला पारंभ झाला आहे. राजापूरमधील ताम्हाणे माध्यमिक विद्यालय, मॉडर्न स्कूल साखरीनाटे, आचार्य एन.डी. विद्यालय भू, लांजातील एन.ई.स्कूल पुनस, सापुचेतळे येथील एन.ई.स्कूल, गुहागरमधील काजिर्ली माध्यमिक विद्यालय, खेडमधील तुंबाड एन.ई.स्कूल, तसेच चिपळूणमधील एन.ई.स्कूल करंबवणे, भोम, वीर, कळंबट, नांदिवसे, आधार माध्यमिक विद्यालय, कुशीवडे या माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. दापोलीमध्ये श्री शिवाजी हायस्कूल, करंजणी, लोकमान्य टिळक विद्यालय चिखलगाव या या शाळांचा समावेश आहे.









