जिल्ह्यात 24 तासात 106 नवे कोरोना बाधित;  7 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर सात रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्याने 106 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 73 हजार 33 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यँत 68 हजार 876 रुग्ण बरे झाले आहेत. तर 24 तासात 153 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. नव्याने 7 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 7 पैकी 24 तासातील 4 त्यापूर्वीचे 3 असे 7 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 142 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.93 तर रिकव्हरी दर 94.31 टक्के आहे. सद्यस्थितीत लक्षण नसलेले 1 हजार 607 तर लक्षण असलेले 383 असे एकूण 1 हजार 990 रुग्ण उपचार घेत आहेत.