भविष्यात प्रॉपर्टी घेताना विचार करावा लागेल

 पुरानंतरच्या परिस्थितीने चिपळूणकर बेजार 

रत्नागिरी:- या भयानक पूरपरिस्थितीने आमच्यावर काय वेळ आणली. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला रांगेत उभ राहाव लागतं. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ आली. एवढेच नव्हे, तर भविष्यात चिपळूण शहरात प्रॉपर्टी घ्यायची की नाही, याचा विचार करावा लागेल, अशी हताश आणि वेदना व्यक्त करणारी प्रतिक्रिया आपसूक चिपळूणकरांच्या तोंडुन येत होती. पुराने त्यांच्यावर आणलेली ही परिस्थिती अतिशय विदारक आणि मन सुन्न करणारी आहे. 

प्रत्यक्ष या भागाची पाहणी केल्यानंतर हे विदारक सत्य समोर आले. जलप्रलयाने सर्वांच्या आशा, अकांक्षा अपेक्षा पाण्यात गेल्या होत्या. पुराने चिपळूणकरांना दहा ते पंधरा वर्षे मागे नेले आहे. २००५ नंतर प्रथमच चिपळूणकरांवर ही परिस्थिती आली होती. संपूर्ण शहरात सुमारे १० ते १२ फूट पाणी होते. पाण्याला एवढा प्रचंड वेग होता की त्याच्या वाटेत आलेली वाहनं, अनेक संसार, व्यवसाय, व्यापार उद्ध्वस्त केले. दरवर्षी येणाऱ्या पुराबाबतचा नागरिकांचा अंदाज चुकला आणि हजारो नागरिक पुरात अडकले. प्रशासन, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था, एनडीआरएफचे जवान आदीच्या मदतीने रेस्क्यू करून शेकडो नागरिकांना बाहेर काढले.  मात्र तीन दिवसांनी पूर ओसरल्यानंतरचे चित्र अंत्यंत करूण होते.  रस्ते, दुकान गाळे, घरे, बिल्डिंग आदींमध्ये प्रचंड गाळ होता. पुराच्या पाण्याच्या पातळीच्या खुणा दिसत होत्या. वाहने वाहुन अस्ताव्यस्थ स्थितीत दिसत होती. डोळ्यात आस , हातात सफाईचे साहित्य घेऊन चिखल उपसण्याच काम सुरू होते.

वीज पूरवठा नसल्याने चिपळूणध्ये पिण्याचे पाणी मिळत नव्हते. नागरिकांना खायला मिळत नव्हते. मदतीचे साहित्य जात होते. तेव्हा पाण्यासाठी नागरिक त्या वाहनांच्या पाठुन धावताना दिसत होते. थोडी-थोडी मदत सर्वांनाच मदत मिळावी, यासाठी नागरिकांना रांगेत उभे राहून त्यांच्यापर्यंत मदत पोहचविण्याच काम सुरू होते.  यावेळी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया मन सून्न करणाऱ्या होत्या. काही उच्चभ्रुंनाही पाण्यासाठी रांगेत उभा राहावे लागत होतं किंवा वाहनांच्या मागून जाव लागत होते.

चिपळूण शहरातील आर्चिट कॉम्प्लेक्स, भेंडीनाका, चिंचनाका, मार्कंडी, नगपालिका वसाहत, गोवळकोट, मापारी मोहल्ला, खिंड या भागातील ही परिस्थिती आहे.