जिल्ह्यात 24 तासात 364 पॉझिटिव्ह रुग्ण; 6 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 364 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या कालावधीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 6 जणांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 944 इतका झाला आहे.

नव्याने 364 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 68 हजार 726 रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत 3 हजार 199 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज 329 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3199 जण उपचार घेत आहेत.