संगमेश्वरः– मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरमधील गड नदीला आणि राजापूरमधील कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकण, मराठवाड्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे गडनदीला आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होत. आधीच खाडीला भरती त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे माखजन बाजरपेठेत पुराचे पाणी शिरले होते.
गेले अनेक दिवस हुलकावणी देणारा पाऊस पुढील दोन दिवसांत जोरदार कोसळणार आहे. दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात होईल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.