जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 268 जण कोरोनामुक्त

 नवे 469 रुग्ण; 10 मृत्यूचीही नोंद

रत्नागिरी:-जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 268 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 570 जणांनी कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 91.07 टक्के आहे. दरम्यान नव्याने 469 रुग्ण सापडले असून उपचारा दरम्यान 10 रुग्ण मृत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 30 मृत्यूची नोंद होती. रविवारी देखील 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात यापूर्वीचे 8 तर 24 तासातील 2 मृत्यू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने 1900 बळी घेतले आहेत तर मृत्युदर 2. 86 टक्के आहे. 

24 तासात 469 नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंत 66 हजार 510 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 5 हजार 21 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत 4 लाख 36 हजार 714 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सद्यस्थितीत गृहविलगिकरणात 1 हजार 409 तर संस्थात्मक विलीगिकरणात 2 हजार 200 जण आहेत.