रत्नागिरी:- कोकण रेल्व मार्गांवर उक्षी टनेल मध्ये मडगांवाकडं जाणारी राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. रत्नागिरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी टनेल येथे पहाटे राजधानीचे इंजिन घसरले. ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
मात्र कोकण रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगार यांच्या कामगिरीमुळे ६ तासांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर घसरलेले राजधानी एक्सप्रेसचे इंजिन पुन्हा मार्गस्थ करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे. अवघ्या ६ तासानंतर राजधानी एक्सप्रेस रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाली आहे. कोकण रेल्वेचे अधिकारी अभियंते आणि कामगारांनी अत्यंत कमी वेळात ही कामगिरी केली आहे.