रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 457 तर त्यापूर्वीचे 305 असे एकूण 762 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 241 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 216 तर यापूर्वीच्या 305 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 48 हजार 213 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 11 तर त्यापूर्वीचे 5 अशा 16 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 639 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3. 39 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 488 मृत्यू, चिपळूण 308, संगमेश्वर तालुक्यात 180, खेड तालुक्यात 162 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 13 झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 426, रविवारी 484, सोमवारी 488, मंगळवारी 655, बुधवारी 623, गुरुवारी 493, शुक्रवारी 440 तर शनिवारी 251 रुग्ण सापडले होते. नव्याने 457 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 818 पैकी 241 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 2 हजार 974 पैकी 216 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 213 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 4 हजार 792 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 457 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9.54% आहे.