पूर्णगडमधील एकाच वाडीत 27 पैकी 22 जण पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड गावात कोरोनाची चाचणी केलेल्या एकाच वाडीतील 27 पैकी तब्बल 22 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

एकाचवेळी इतक्या प्रमाणात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली असून या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताना लोकप्रतिनिधीकडून हस्तक्षेपामुळे या रुग्णांना दाखल करताना अडचणी येत आहेत. जिल्ह्यात आज पासून सुरू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे.