जिल्ह्यात 24 तासात 437 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 437 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी अचानक रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने चिंतेत भर पडली होती मात्र गुरुवारी रुग्णसंख्य काही प्रमाणात कमी झाल्याने दिलासा मिळाला. नव्याने सापडलेल्या 437 रुणांपैकी 237 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 200 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 437 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 34 हजार 626 झाली आहे. जिल्ह्यात आज 486 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील 24 तासात 14 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. वाढत्या मृत्यू आणि वाढलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य विभाग चिंतेत आहे. नव्याने झालेल्या 14 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात 7 मृत्यू आहेत. याशिवाय लांजा 1, राजापूर 1, संगमेश्वर 1, दापोली 1 चिपळूण 2 आणि खेड तालुक्यात एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 149 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 334 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 229, खेड 120, गुहागर 62, दापोली 101, संगमेश्वर 147, लांजा 63, राजापूर 81 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. 

जिल्ह्यात  बुधवारी 343, गुरुवारी 339, शुक्रवारी 450 तर शनिवारी 372, रविवारी 402, सोमवारी 393 तर मंगळवारी 315, बुधवारी 635 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 437 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 237 रुग्ण आरटीपीसीआर तर 200 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 34 हजार 626 वर जाऊन पोहचली आहे.