रत्नागिरी:- राजापूरच्या सीमावर्ती भागात वादळाची एन्ट्री झाले असून तालुक्यात सागवे, नाटे, जैतापूर, आंबोलगड, मुसाकाझी परिसरात वादळी वारा व पाऊस सुरू झाला आहे. आंबोलगड येथील 68 कुटुंबातील 254 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. मुसाकाझी येथील दोन कुटुंबातील लोकांचे स्थलांतर केले.
तर आवळीचीवाडी येथील 7 कुटुंबातील 35 व्यक्तीचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. राजापूर डोंगर मार्गावर झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली असून, झाड हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. नाटे आणि परिसरात वेगाने वारे वाहायला सुरुवात झाली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.
जैतापुरात वाऱ्यामुळे घरांची पडझड झाल्याचे व्रृत्त आहे









