रत्नागिरी:- कोरोना संसर्ग होण्याचा संभव असल्याचे माहिती असूनही मटण विक्रेत्याने तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवार 9 मे रोजी सकाळी 9.15 वा.सुमारास जे.के.फाईल्स रोडलगत करण्यात आली.
विशाल वसंत गायकवाड (27,रा.जे.के. फाईल्स जवळ,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काँस्टेबल संतोष अप्पासाहेब गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,रविवारी सकाळी विशाल आपल्या मालकीचे महाराष्ट्र मटण शॉपमध्ये तोंडाला मास्क न लावता विक्री करत होता.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.