लाॅकडाऊनमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील मंदिरात २१ एप्रिल रोजी कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचा धोका असल्याचे माहीत असूनही तसेच लाॅकडाऊन संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रकरणी ७ जणांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदर घटना दापोली तालुक्यातील वणंद लोवरेवाडी येथील मंदिरात बुधवार २१ एप्रिल रोजी रात्री १२ वा. सुमारास घडली. वसंत लोवरे, समीर काटकर, सुजित काटकर, सिध्देश लोवरे, राजेश लावरे, सचिन लोवरे आणि संजय लोवरे (सर्व रा.वणंद लोवरेवाडी, दापोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात नारायण नागेश गुजर (५७, रा.वणंद गुजरवाडी, दापोली) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, या सर्वांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करत तेथील साई मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस हेड कांस्टेबल सुकाळे करत आहेत.