रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना उपचाराखाली असणारे रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 26 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 529 जणांचा मृत्यू झाला आहे. 26 पैकी सर्वाधिक 11 मृत्यू संगमेश्वर तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 5, दापोली 3, रत्नागिरी तालुक्यात 3, खेड 2, गुहागर तालुका 1 आणि लांजा तालुक्यात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे









