रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाला असून आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण मागील 24 तासात सापडले आहेत. आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 522 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 522 पैकी 317 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 205 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 522 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 14 हजार 560 झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 522 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 14 हजार 560 वर जाऊन पोहचली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात 317 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 205 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत 112 पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील 24 तासात उपचारखाली असलेल्या 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीत सर्वाधिक 6 तर लांजा आणि गुहागर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 429 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.94 % आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 522 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 124, दापोली 55, खेड 36, गुहागर 63, चिपळूण 125, संगमेश्वर 99, मंडणगड 1, राजापूर आणि लांजा तालुक्यात 16 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.45% आहे.









