रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर फोफावू लागला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 155 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापसले आहेत. सापडलेल्या 155 पैकी 111 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 44 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. एका दिवसात 155 रुग्ण सापडण्याची ही पहिली वेळ असून मागील काही दिवसांपासून वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून शुक्रवारी जिल्ह्यात 155 नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवारी जिल्ह्यत 94, बुधवारी 87 तर गुरुवारी 78 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. यामुळे आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 11 हजार 262 वर जाऊन पोहचली आहे. जिल्ह्यात आज 673 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 101364 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
चोवीस तासात 54 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 204 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 90.60 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 377 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.35 % आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 155 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 56, दापोली 5, खेड 9, गुहागर 27, चिपळूण 35, मंडणगड 1, राजापूर 2, लांजा 2 आणि संगमेश्वर तालुक्यात 18 रुग्ण सापडले आहे. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 9.93% आहे.