रत्नागिरी:- कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने परत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात तब्बल 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या पाच महिन्यातील आज सर्वात जास्त कोरोना बाधित आढळले आहेत. याच कालावधीत तब्बल 552 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात 367 बळी घेतले आहेत.
मागील 24 तासात नव्याने 42 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 98 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 552 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 83 हजार 599 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात 11 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 541 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा बळी गेलेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 367 इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.48 टक्के आहे.









