8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील सरपंच निवड

रत्नागिरी:- 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातील सरपंच निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांनी या तीन दिवसात आपले पुरेसे कर्मचारी वर्ग बघून सरपंच पदाच्या निवडणुका घ्यावयाच्या आहेत.  

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यानंतर सरपंच पदासाठी आरक्षण प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून आता गावचा कारभारी कोण होणार हे 8 ते 10 फेब्रुवारी दरम्यान स्पष्ट होणार आहे.