60 व्या राज्य नाट्य स्पर्धेत ‘बाकी शून्य’ प्रथम,  ‘लिअरने जगावं की मरावं ?’ द्वितीय

रत्नागिरी:-60 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचा निकाल लागला असून स्पर्धेत रत्नागिरी – सिंधुदुर्ग केंद्रातून साईकला कला क्रीडा मंच, पिंगुळी या संस्थेच्या ‘बाकी शून्य’ या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तर समर्थ रंगभूमी, रत्नागिरी या संस्थेच्या ‘लिअरने जगावं की मरावं ?’ या नाटकास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.बाबा वर्दम थिएटर , कुडाळ या संस्थेच्या ‘गांधी विरुध्द सावरकर’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे .

दिग्दर्शनसाठी प्रथम पारितोषिक ओंकार पाटील ( नाटक लिअरने जगावं की मरावं ? ), द्वितीय पारितोषिक केदार देसाई ( नाटक – बाकी शून्य ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक – राजेंद्र शिंदे ( नाटक – लिअरने जगावं की मरावं ? ) , द्वितीय पारितोषिक – शाम चव्हाण ( नाटक – प्रतिमा एक गाणे ) , नेपथ्य प्रथम पारितोषिक – प्रविण धुमक ( नाटक लिअरने जगावं की मरावं ? ) , द्वितीय पारितोषिक – प्रदीप मेस्त्री ( नाटक- बोगनवेल ), रंगभूषा प्रथम पारितोषिक – गोपाळ चेंदवणकर ( नाटक- लोककथा – ७८ ) , द्वितीय पारितोषिक – संजय जोशी ( नाटक – तुका अभंग अभंग ) , उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक तृप्ती राऊळ ( नाटक बाकी शून्य ) व केदार देसाई ( नाटक- बाकी शून्य ) , अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे साक्षी हळदणकर ( नाटक- लोककथा -७८ ) , आसावरी आखाडे ( नाटक – प्रतिमा- एक गाणे ), ऋचा मुकादम ( नाटक लिअरने जगावं की मरावं ? ), वैशाली जाधव ( नाटक- मु.पो. किन्नोर ), सुविधा कदम ( नाटक – कायापालट ) , डॉ . गुरुराज कुलकर्णी ( नाटक – गांधी विरुध्द सावरकर ) , ओंकार आंबेरकर ( नाटक- तुका म्हणे ) , मंदार कुंटे ( नाटक – बाकी शून्य ) , कुणाल गमरे ( नाटक थैमान ) , रोहीदास चव्हाण ( नाटक – चांडाळ चौकडी )

 दि . २२ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२२ या कालावधीत स्वा . वि . दा . सावरकर नाटयगृह रत्नागिरी व मामा वरेरकर नाटयगृह , मालवण येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले . स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री . श्रीपाद जोशी , श्री . नंदकुमार सावंत आणि श्रीमती प्राची गोडबोले यांनी काम पाहिले . सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.