45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये 

रत्नगिरी:- कोरोनावरील लसीकरण मोहीमेत 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिल्या पाच मध्ये आहे. लशीचा एकही डोस वाया जाणार नाही असे नियोजन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.

कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरळीत होण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. एकही डोस वाया जाणार नाही असे नियोजन केले जात आहे. कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरु झाली तेव्हा लोकांची मानसिकता नव्हती; मात्र आता लस कमी आणि मागणी अधिक अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यात 45 वर्षांवरील साडेचार लाख लोक आहेत. 45 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणात रत्नागिरी जिल्ह्याने चांगले नियोजन केले आहे. जिल्ह्यात 2 लाख 28 हजार 094 जणांना लशीची मात्रा देण्यात आली आहे. त्यात पहिला डोस 1 लाख 76 हजार 957 तर दुसरा डोस 51 हजार 137 जणांना मिळाला आहे. जिल्ह्याला कोव्हिशिल्डचा पहिला डोस 1 लाख 31 हजार 723 लोकांना दिला आहे. नियोजन चांगले असल्यामुळे जिल्ह्याला काही दिवसांपूर्वी एकदम 20 हजार डोस मिळाले होते. सध्या एकही डोस वाया जाणार नाही, असे नियोजन केले जात आहे.