रत्नागिरी:- कोरोना लसींचा जिल्ह्याला होत असलेला पूरवठा कमी असल्यामुळे सर्वत्र गेंधळाचे वातावरण व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. यासाठी प्रशासनस्तरावरून शासनाच्या निर्देशानुसार यापुढे पुढील आदेश होईपर्यंत फक्त 45 वर्षावरील वयोगट असणाऱ्या नागरिकांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. खास करून दूसरा डोस देण्यात येणार आहे. जर लसींचा साठा उरला तर 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जाईल. हे लसीकरण, ऑफलाईन सुध्दा होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील सर्व नागरिक कोविड -19 पासून संरक्षण होण्यासाठी सर्व नियमांचे पालन करत आहात. रत्नागिरी जिल्हयातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे डॉक्टर्स, दवाखाने यांच्या वरील ताण वाढला आहे. यावर एकमात्र उपाय म्हणजे लसीकरण. लसीकरण नियोजित वेळेवर आणि व्यवस्थित होण आवश्यक आहे. यापूर्वी लसीकरण दोन भागात होत होते. पहिला भाग म्हणजे 45 वर्षावरील वयोगट व दूसरा भाग म्हणजे 18 ते 44 चा वयोगट. 18 ते 44 च्या वयोगटाला राज्यशासनाचा लस पूरवठा होता. 45 वर्षांवरील साठी केंद्रशासनाकडे हा विषय होता. मात्र लसींचा पूरवठा कमी होत असल्यामुळे सर्वत्र गेंधळाचे वातावरण व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता. याचा ताण प्रशासनावरही आलेला होता. याबाबत जिल्हास्तरावरून शासनाला कळविण्यात आले होते. शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आता शासनाच्या निर्देशानुसार यापुढे पुढील आदेश होईपर्यंत फक्त 45 वर्षावरील वयोगट असणाऱया नागरिकांचेच लसीकरण करण्यात येणार आहे. खास करून दूसरा डोस देण्यात येणार आहे. जर लसींचा साठा उरला तर 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांनाच पहिला डोस दिला जाईल. हे लसीकरण, ऑफलाईन सुध्दा होणार आहे. यामुळे आत्तापर्यंत असलेली संभ्रमावस्था नष्ट होणार आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे यापुढे ग्रामिण भागासाठी ऑनलाईन नोंदणीवर अवलंबून न राहता टोकन पध्दतीचा अवलंब करून लसीकरण करण्यात येणार आहे. याचा खूप मोठा दिलासा ग्रामिण भागातील नागरीकांना मिळणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेनुसार आपले टोकन घेऊन कोणत्याही प्रकारची गर्दी न करता शांततेने लस घ्यावी. शहरी भागासाठी मात्र फक्त आणि फक्त ऑनलाईन नोंदणी असणाऱ्यांनाच लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुढे लसीचा साठा सुरळीत व योग्य प्रमाणात होणार सर्व असून नागरिकांनी त्रासून जाण्याची आवश्कता नाही. लवकरच आपण सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, रोज दुपारी 12.00 वाजता cowin.gov.in या वेबसाईटवर आपल्या भागाच्या पिनकोड प्रमाणे लसीचे अपडेट पहावे. त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांनी आपली नोंदणी झाली असेल तर संबंधित केंद्रावर थांबाव.s कारण त्या केंद्रावर नियोजनानुसार जेवढ्या लसी उपलब्ध आहेत तेवढ्याच देण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये व विनाकारण केंद्रावर न थांबता आपल्या वेळेचा अपव्यय करण्यात येवू नये, लसीकरण सुरळीत होण्यासाठी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून रत्नागिरी जिह्यातील सर्वानाच लसीकरण करणे हा आपला उद्देश लवकरात लवकर पूर्ण होईल. यासाठी प्रशासनासही सहकार्य होईल. लसीकरण संदर्भात काही शंका असल्यास किंवा महिती हवी असल्यास 02352- 221403 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्प करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बबिता कमलापूरकर, जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केले आहे.