रत्नागिरी:- नववर्षाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असतानाही जिल्ह्यातील काही नागरिकांचे बेफिकिरीचे वागणे संक्रमण वाढीसाठी कारणीभूत होऊ शकते म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले.त्यामध्ये जिल्ह्यातील २५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रत्नागिरी शहरात मारूती मंदिर, मांडवी, जयस्तंभ, भाटये याठिकाणी शहर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. मारूती मंदिर याठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले,विजय जाधव,संगमेश्वर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख पोलीस उपनिरीक्षक आकाश साळुंखे, धनंजय चव्हाण,पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश कुबडे, जयवंत बगड व अन्य अंमलदार उपस्थित होते.विना मास्क फिरणा-या लोकांवर पोलिसांचे विशेष लक्ष होते. तर मांडवी जेटीवर नागरिकांची गर्दी झालेली होती. शहर पोलिसांकडून जमावबंदीच्या आदेशाची घोषणा झाल्यावर काही सेंकदात मांडवी जेटीवरील गर्दी पूर्णपणे ओसरून गेली.