मागील 24 तासात जिल्ह्यात 653 जण कोरोनामुक्त
रत्नागिरी:जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 653 जण कोरोनामुक्त झाले आहेत तर 484 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 245 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 239 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 484 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 26 हजार पार झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 18 मृत्यूंची नोंद झाली आहे.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 484 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 26 हजार 385 जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 245 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 239 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 18 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 791 इतकी आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 6 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.99 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज 653 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 19843 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 75.20% आहे.मागील चोवीस तासात 1821 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,35,906 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.