24 तासात 627 कोरोना पॉझिटिव्ह; आरटीपीसीआर मधील सर्वाधिक रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात रुग्णसंख्येत रोज लक्षणीय वाढ होत आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 627 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 404 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 223 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 627 नवेे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 24 हजार 849 झाली आहे. जिल्ह्यात आज 23 मृत्यूची नोंद झाली आहे. तर उपचाराखाली असणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 6593 एवढी आहे.

मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 203 पॉझिटिव्ह रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. नव्याने आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात 627 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 24 हजार 849 जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 404 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 223 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. 

मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 23 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 738 इतकी आहे. चिपळूण तालुक्यातील  सर्वाधिक 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.96 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज 608 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 17518 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 70.49% आहे.

मागील चोवीस तासात 1094 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,32,502 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यातील आज सापडलेल्या 627 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 203, दापोली 43, खेड 25, गुहागर 66, चिपळूण 146, संगमेश्वर 68, मंडणगड 3, राजापूर 49 आणि लांजा तालुक्यात 24 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.79% आहे.