रत्नागिरी:- मागील 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 37 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1247 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय रत्नागिरी येथील 5, घरडा कंपनी खेड येथील 7, कामथे 14, लांजा 6 आणि दापोली 5 असे एकूण 37 रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. यामूळे एकूण रुग्णसंख्या 1247 झाली आहे. यामध्ये एका खाजगी रुग्णालयातील 5 जण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील आज एका रुग्णाची तपासणी केल्यावर तो रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळला आहे.