24 तासात जिल्ह्यात 28 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- मागील 24 तासात जिल्ह्यात 28 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.तर एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 371 वर पोचली आहे. 24 तासात 796 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील 24 तासात नव्याने 28 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 491 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात 796 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 93 हजार 743 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

चोवीस तासात 19 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 9 हजार 882 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एका रुग्णाचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 371  इतकी आहे. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 94.19 टक्के आहे.