जिल्ह्यात 24 तासांत 175 कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

रत्नागिरी:- कोरोनाचा विळखा रत्नागिरी जिल्ह्यावर दिवसेंदिवस अधिक घट्ट होऊ लागला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात आणखी 175 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 5 हजार 763 झाली आहे. जिल्ह्यात आज दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर जिल्ह्यातील एकूण मृत्यूसंख्या 159 झाली आहे.

चोवीस तासात जिल्ह्यात 175 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये आरटीपिसीआर चाचणीत 87 जण तर अँटीजेन चाचणीत 88 कोरोना बाधित सापडले आहेत. चिपळूण तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी सर्वाधिक 64 रुग्णांची नोंद झाली आहे. आरटीपिसीआर चाचणीत खेड 31, गुहागर 10, चिपळूण 18, संगमेश्वर 15, रत्नागिरी 10 आणि राजापूर तालुक्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत खेड 13, संगमेश्वर 1, चिपळूण 46, रत्नागिरी 21, राजापूर 1 आणि लांजा तालुक्यातील 6 जणांचा समावेश आहे.