गटाराचे पाणी रस्त्यावर येऊन महामार्गाला नदीचे स्वरूप

संगमेश्वर:- महामार्गावर संगमेश्वर धामणी ते तुरळ दरम्यान रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित गटार नसल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. तर काही ठिकाणी मोठे खड्डा पडल्याने अपघात ही घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येथे गेली तीन चार वर्षे मुंबई‚ गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. याठिकाणी ठेकेदाराने गटाराची व्यवस्था केलेली नाही. गेल्यावर्षी सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात येणार होते. तेव्हा अधिकारी व ठेकेदार यांनी. महमार्गावरील समस्या दूर करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ठोस कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
पावसाळ्यापूर्वी आरवली येथे गटारांची व्यवस्था करायला हवी होती, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले.पावसाळा सुरु झाला तरी महामार्ग बांधकाम विभाग आणि ठेकेदार कंपनी यांनी नियोजन न केल्याने आरवली येथे चिखलाचे, सामÏाज्य निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवासी जनतेला बसत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. अगोदर खड्डा आणि आता चिखल यामुळे प्रवासी जनतेला चालणे कठीण बनले आहे. या चिखलाचा त्रास वाहधारकांनाही होत आहे. ठेकेदार याच्या बेजबादार आणि दुर्लक्षित कारभारामुळे लोकांना हा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तुरळ ते धामणी दरम्याने रस्त्यावर गटार्याचे पाणी येत असल्याने नदीचे स्वरूप प्राप्त होत आहे. खड्ड्यामध्ये पाणी साचून गाडीही फसण्याची शक्यता असून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.