कर्ला-आंबेशेत येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत स्वार जखमी

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कर्ला-आंबेशेत रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला ठोकर दिली. या अपघातामध्ये स्वार जखमी झाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना मंगळवारी (ता. १८) दुपारी दोन च्या सुमारास आंबेशेत रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत भाऊ वालम (वय ५८, रा. कर्ला-आंबेशेत, रत्नागिरी ) हे कर्ला ते आंबेशेत असे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात वालम जखमी झाले. उपचारासाठी त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.