देवधे येथे दुचाकी स्लिप होऊन एकजण जखमी

रत्नागिरी:- देवधे (ता. लांजा) येथील रस्त्यावर दुचाकी स्लीप झाल्याने अपघात झाला. या अपघातात एकजण जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. दत्ता सिद्धेश्वर कांबळे असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १२) दुपारच्या सुमारास देवधे रस्त्यावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार दत्ता कांबळे व त्याचा मित्र खंडू आप्पा शिलेदार यांच्या दुचाकी (क्र. एमएच-०८ सीव्ही ९५१३) वरुन लांजा येथील खाण मालक अनिकेत साळवी यांच्याकडे कामाच्या हिशेबासाठी आले होते. हिशेब झालेल्यावर ते परत कुरतडे येथे जात असताना देवधे रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली. या अपघातात. दत्ता सिद्धेश्वर कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे.